ADvt

प्रतिष्ठीत व्यावसायिकाला अं 19 लाखाने लुटणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.....



सिनेस्टाईल दुचाकी अडवून नगदी 19 लाखाची रोकड केली होती लंपास....

2 आरोपींना अटक :- 10 महिन्यानंतर गुन्हा उघडकीस, 

मुल :- मनीष रक्षमवार

     दिनाक 16/03/2022 रोजी फिर्यादी  दिनेश प्रकाश चलाख वय 33 वर्षे राहाणार सिंतळा मुल व त्यांचा मित्र अक्षय विलास गोवर्धन वय 27 वर्षे राहाणार शिवाजी नगर वार्ड क्रमांक 17 मुल जि जिल्हा चंद्रपूर हे दोघे त्यांचे मालक दिनेश गोयल यांचे महालक्ष्मी ट्रेडींग कंपनी ची विवीध ठिकाणावरून वसुली करून परत येत असतांना अंदाजे रात्री 8 वाजता ते 9 वाजता दरम्यान चंद्रपूर मुल रोडवरील जानाळा ते डोणी फाट्याजवळ मागुण येणाऱ्या मोपेड मोटार सायकल वरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचे गाडीचे हॅन्डल पकडून खाली पाडुन त्यांना मारहाण करून त्याचे जवळील 18,93,520/ - रुपयाची नगदी रोकडची बॅग जबरीने हिसकावून घेवून गेले. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशंन  मुल अपराध क्रमांक 154/2022 कलम 394 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
     सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये बाळासाहेब खाडे पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे देण्यात आला.  दिनाक 20/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, मुल येथील  केतन अशोक बुटले वय 23 वर्षे व तौहीद आरीफ शेख वय 24वर्षे दोन्ही राहाणार वार्ड  क्रमांक 17 ताडाळा रोड मुल जिल्हा चंद्रपूर यांनी सदरचा गुन्हा केला आहे त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे,  नितीन साळवे प्रकाश बल्की  प्रमोद डबारे . सुभाष गोहोकार . सतिश बगमारे यांचे पथक गठीत करून नमुद आरोपीतांवर गोपनिय पाळत ठेवली असता ते मिळून आले त्यांना गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. 
     आरोपीने चोरीचे रोकडमधुन खरेदी केलेले 4,00,000/- रूपयाची . एक लाल रंगाची वरणा चारचाकी वाहन जुनि वापरती वाहन  क्रमांक एमएच40 एसि 6354  2,25,000/- रुपयाची एक जुनी वापरती खाकी रंगाची बुलेट मोटार सायकल  क्रमांक एमएच.34 बिएस 8333 तसेच गुन्हयात वापरलेले वाहन  1,00,000/- रूपयाची एक जुनी लाल रंगाची मारोती 800 चारचाकी वाहन  क्रमांक एमएच 31 झेड 3789 मालमत्ता आरोपीतांकडून हस्तगत करण्यात आली. आरोपींचा पिसिआर घेवून उर्वरीत मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.
    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे,नितीन साळवे  प्रकाश बल्की  प्रमोद डंबारे सुभाष गोहोकार  सतिश बगमारे  यानी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास बाळासाहेब खाडे, पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments