ADvt

जुनाड खदाणीत काम सुरू असतानाच लागली आग...सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदारी वेकोली अजुनही गंभीर नाही?

वणी :- सुरज चाटे
     वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असून सदर खाणीत कोट्यवधींची उलाढाल होत असते. दिनांक 22 जानेवारी 2023 ला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या यंत्राला काम सुरू असताना अचानक पी सि मशीन ला आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने वेकोली प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. 
     वणी तालुक्यातील जुनाड खदान येथे माती उचलण्याचा ठेका दिला असुन अचानक दिनांक 22 जानेवारी 2023 ला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान पीसी मशीन ला आग लागल्याने तारांबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी इतर वेकोलीतील मशीन दाखल होऊन तेथीलच माती टाकून सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. वेकोलीत ठेकेदारीने काम करणाऱ्या व कोट्यवधींची उलाढाल असलेल्या वेकोलीत ठेकेदारीच्या सुरक्षेच्या सोयी दिसून येत नसून अग्निशमन विभाग सुद्धा मावळला की काय? असाच कयास लावण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून पीसी मशीन चे मात्र मोठे नुकसान झाले आहे, ही आग मशीन ला जास्त प्रेशर झाल्याने शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचा कयास वर्तविल्या जात आहे. 

Post a Comment

0 Comments