ADvt

वणीत दंगा....... छत्रपती शिवाजी महाराज चौकात खळबळ...प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेला नेमका प्रकार काय?

वणी :- सुरज चाटे

    वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच टिळक चौकात दिनांक 25 जानेवारी 2023 ला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दंगा काबू करण्याची रंगीत तालीम चे प्रात्यक्षिके (मोक ड्रिल) पोलिसांद्वारे करण्यात आले दरम्यान मोठी बघ्यांची गर्दी जमली होती. 


     वणीतील शिवाजी चौक येथे दंगा काबू करण्याची रंगीत तालीम पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली यात शिवाजी चौक परिसरात मोठा दंगा होत असल्याची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दंगा मोठा उग्र स्वरूपाचा असल्याने व जाळपोळ झाल्याने अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले व लाठीचार्ज करीत फायरिंग करण्यात येऊन दंगा काबू करण्यात आल्याची रंगीत तालीम पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली. 


     यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार साहेब, वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रदिप शिरस्कर, स मो नि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, स पो नि प्रवीण हिरे, आशिष झिमटे, मारेगाव पोलीस, मुकुटंबन पोलीस, पाटण पोलीस, शिरपुर पोलीस स्टेशन येथील काही अधिकारी व कर्मचारी या रंगीत तालमीत सहभागी झाले ही तालीम उत्कृष्ठ असुन यातून अशा परिस्थितीवर कशी मात करता येईल याचे उदाहरण यातून स्पष्ट केले. 

Post a Comment

0 Comments