ADvt

मिस्त्री पाहण्यासाठी गेला अन जीवनाचा घात झाला
उभ्या ट्रकला दुचाकीची धडक :- एक ठार तर एक गंभीर....

वणी :- सुरज चाटे

     वणी तालुक्यातील, वणी – कायर मार्गावरील नवरगाव फाट्याजवळील दुचाकी अपघातात पळसोनी येथिल एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 ला रात्री अं 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे. 
     हि घटना आज रात्री 9 वाजता चे सुमारास वणी- कायर मार्गावरील नवरगाव फाट्याजवळील घडली. पळसोनी येथिल रहिवासी असलेले अजय खैरे व अनिल टिकले हे दोघेही आज सोमवार ला सायंकाळी कायर येथे मिस्त्री पाहण्यासाठी गेले होते. कायर वरुन वापसी येताना नवरगाव गावाजवळील फाट्याजवळ एका नादुरुस्त उभा असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने अजय आणि अनिल चा अपघात झाला. दरम्यान त्यांना तात्काळ वणी येथे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अजय चा मृत्यू झाल्याची माहिती दिली तर गंभीर जखमी असलेल्या अनिल ला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अजयच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन अजयच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Post a Comment

0 Comments