ADvt

इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब कडून उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजनतज्ञ प्रशिक्षकांची उपस्थिती :- शासकीय मैदान (पाणी टाकी) येथे रंगणार प्रशिक्षण..

वणी :- सुरज चाटे

     वणीतील प्रसिद्ध इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब नेहमीच क्रिकेट खेळाडूंकरिता व क्रिकेट प्रेमींकरिता नवनवीन स्पर्धा व उपक्रम राबवित असतात त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
     सदर शिबीर दिनांक 20 एप्रिल ते 30 मे 2023 या कालावधीत शासकीय पाणी टाकी मैदान वणी येथे पहाटे 6 ते 8 व सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार असून यात तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यांना कुणाला या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी राजेंद्र मदान 9822576861, मंगेश करंडे  9850153883, सचिन पान्डे 9970035251, संतोष चिलकावार 9970035251 या क्रमांकावर संपर्क साधावा, होणाऱ्या शिबिराचा गरजूंनी व क्रिकेट क्षेत्रात आपल्या यशाचा ठसा उमटवू पाहणाऱ्या नव युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब चे अध्यक्ष राजेंद्र मदान यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments