ADvt

विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजनवणी :- सुरज चाटे

    सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि मंडल आयोगाचे पुरस्कर्ते व्ही.पी सिंग यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा *"" गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारचे  आयोजन रविवार, दि. 9 जुलै 2023 ला सकाळी 11:00 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे केलेले आहे.

     या सेमिनारला  करिअरवाला या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक व Success Point, चंद्रपूरचे संचालक मा. विजय मुसळे  हे *""इयत्ता 5, 8, 10 व 12 वी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व प्रवेश, स्पर्धा व स्कॉलरशिप परीक्षा व देश-विदेशातील शिक्षणाच्या संधी आणि 10 वी, 12 वी व पदवीनंतर पुढे काय?  * या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

     कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष मा. प्रदीप बोनगिनवार तर उद्घाटक म्हणून रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी तथा वसंत जिनिंगचे संचालक मा. संजय खाडे  हे राहणार आहेत,तर प्रमुख अतिथी म्हणून वसंत जिनिंगचे अध्यक्ष मा.आशिष खुलसंगे, साईकृपा कन्स्ट्रक्शनचे संचालक राजाभाऊ बिलोरिया, संपर्क प्रमुख,विदर्भ प्रदेश राष्ट्रीय चर्मकार महासंघ मा. संबा वाघमारे, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती मारेगावचे अध्यक्ष मा. बाबाराव ढवस, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती झरीचे समन्वयक मा. नेताजी पारखी आणि ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मा. वैभव ठाकरे राहणार आहेत.तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गात येणाऱ्या प्रत्येक समाजातील एक प्रतिनिधी विचारपीठावर उपस्थित राहणार आहेत, तरी *आपल्या मुलांचे करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन आयोजक OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरीच्या वतीने  करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments