ADvt

पुसद अर्बन कॉ ऑप. बँकेची निवडणुक सलग तिसऱ्यांदा अविरोध…



यवतमाळ :- सुरज चाटे
     
     संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र व 37 शाखांचा कार्यविस्तार असलेल्या पुसद अर्बन कॉ ऑप. बँकेच्या 2023-2028 कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाची निवडणुक अविरोध पार पडली.
     दि.4 जुलै 2023 या अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी निवडून द्यावयाच्या 15 जागेसाठी
पंधराच अर्जच शिल्लक राहिले त्यामुळे दि. 5 जुलै 2023 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पुसद अर्बन बँकेची निवडणुक अविरोध झाल्याचे जाहीर केले.
     अविरोध निवडून आलेल्या संचालंकामध्ये 25 किमीच्या आत वैयक्तिक मतदार संघातून विद्यमान अध्यक्ष शरद आप्पाराव मैंद, तसेच संचालक ललीत हिम्मतलाल सेता, निळकंठ गोविंदराव पाटील, बाळासाहेब जयवंतराव पाटील, के.आय.मिर्झा, प्रवीर प्रकाश व्यवहारे, विनायक गुरुनाथ डुबेवार( रा.सर्व पुसद ),25किमी बाहेरील वैयक्तिक मतदार संघातुन विद्यमान उपाध्यक्ष राकेश ओमप्रकाश खुराणा (वणी), अविनाश नंदकिशोर अग्रवाल (उमरखेड ), अतुल पांडुरंगराव पावडे (नांदेड ), महिला राखीव मतदार संघ सौ. राजश्री सुधीरराव देशमुख (दिग्रस ), सौ. वंदना शरद पाटील (पुसद ), वि. जा. भ. ज. वि.मा.प्र.मतदार संघ सुनील दयाराम चव्हाण (पुसद ), ई. मा. प्र. निरंजन खुशालराव मानकर (यवतमाळ ) अ. जा. अ. ज. मतदार संघ रंजित धर्मिदास सांबरे (पुसद ) यांचा समावेश आहे.
     दरम्यान बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी आपले वडील ऍड. अप्पाराव मैंद यांच्या मार्गदर्शनात जुलै 2002मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर बँकेचा कार्यविस्तार संपूर्ण महराष्ट्रात वाढवित सद्या 37 शाखा प्रगतीपथावर कार्यरत आहेत. अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात व संकल्पनेतून ग्राहकांना बँकिंग क्षेत्राशी निगडित आधुनिक सोयी सुविधा देत असतांना सामाजिक उपक्रमाअंतर्गत असंख्य कामे करून प्रशासनाला देखील सहकार्य करीत आली आहे.त्यांच्याच नेतृत्वात आज सलग तिसऱ्यांदा बँकेची संचालक मंडळाची निवडणुक अविरोध झाली आहे.
निवडणूक अविरोध पार पडण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार संजयभाऊ राठोड, लोकनेते माजीमंत्री मनोहरराव नाईक साहेब, खा.भावनाताई गवळी, आ.ऍड.इंद्रनील नाईक साहेब, आ.ऍड.निलंयभाऊ नाईक,आ.डॉ. वजाहत मिर्झा, आ.समिरजी कुणावार, हिंगणघाट यांचेसह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.
     आपल्यावर विश्वास दर्शविणाऱ्या सर्व सभासद मतदारांचे शरद मैंद यांनी आभार व्यक्त केले आहे..

Post a Comment

0 Comments