ADvt

अन......चिमुकले झाले शाळेत दाखल....शिक्षकांकडून अनोखे स्वागत



आईचं बोट धरून आले अन् ....शिक्षकांकडून अनोखे स्वागत पाहून चिमुकले व पालकही भारावले …..!

•उपसंचालक पियूष आंबटकर यांनीही केले चिमुकल्यांचे स्वागत…

वणी :- सुरज चाटे

    गेली दोन महिन्यानंतर कपाटात विसावलेला गणवेश अंगावर चढवला.. तर शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली. पुस्तकांचा खास गंध श्वासात भरून घेतला.. काहींनी सुटीत मामांच्या गावाला गेलेल्यांनी दप्तर, डब्बा यांच्याशी नव्याने मैत्री केली.. कुणी मित्रांसोबत, कुणी मोठ्या भावासोबत, कुणी बाबांच्या स्कूटरवरून, तर कुणी आईचं बोट धरून शाळेत आले. अन् तेथे जल्लोषात झालेले स्वागत पाहून चिमुकले विद्यार्थी व पालकही भारावले. हे चित्र होते गुरूपौर्णिमेच औचित्यसाधून काल (दि.3 जुलै) मोठ्या जल्लोषात झालेल्या शाळा प्रवेशाचे, अर्थात शाळेच्या पहिल्या दिवसाचे...

मॅकरून स्टुडंट्स अकॅडेमी CBSE ही शाळा वडगाव येथे असल्याने लहान मुलांसाठी त्रासदायकच होत होते. याची जाणीव पालकांना होताच अनेक पालकांनी शाळेचे संचालक पी.एस आंबटकर यांना विनंती केली.त्या विनंतीला मान देत संचालकासमवेत उपसंचालक पियूष आंबटकर यांनी "सिटी ब्रांच" उघडण्यात आली .अवघ्या पहिल्याच वर्षात वणीतील पालकांनी भर भरभरून प्रतिसाद देत मॅकरून शाळेलाच पसंदी दिली व सिटी ब्रांचचे ॲडमिशन "फुल्लही " झाले.गुरूपौर्णिमेचे औचित्यसाधून काल (दि.3 जुलै) रोजी शाळेचा पहिल्या दिवसाची सुरूवात झाली.शाळेचा पहिला दिवशी आईचं बोट धरून आलेल्या विद्यार्थी व पालकांनी शाळेतील शिक्षकांकडून अनोखे स्वागत पाहून चिमुकले व पालकही भारावले. कारण स्वतः शाळेचे उपसंचालक पियूष आंबटकर यांनी पहिल्या दिवशीच त्यांचा पाठ परिचय पालकांना व विद्यार्थांना देत उपसंचालकानी चिमुकल्यांना खेळणीचा माध्यमातून रमविण्याचा प्रयत्नही केला.विशेष शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी "सेल्फी विथ बेबी" असा एक उपक्रम ठेवला व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागतही केलें तसेच फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या देखील काढण्यात आले. यावेळी अनेक पालकवर्ग व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments