ADvt

विषारी द्रव्य प्राशन करून 35 वर्षीय इसमाची आत्महत्याजिल्ह्यातील आत्महत्याचे सत्र कधी थांबणार :- शंकर ने का घेतला असावा टोकाचा निर्णय?....

वणी :- सुरज चाटे

    वणी तालुक्यातील नेरड येथील शंकर मनोहर धाउंडे, 35 वर्ष, यांनी आपल्या घरीच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 04 ऑगस्ट 2023 ला उघडकीस आली. 

     वणी तालुक्यातील नेरड (पुरड) येथील (मॄतक नामे) शंकर मनोहर धाउंडे वय ३5 वर्ष हे आपल्या घरी एकटे होते, दरम्यान ते दुपारच्या सत्रात घरी कोणीही नसतांना विष प्राशन करून आत्महत्या केली, मात्र घरात एकट्या असलेल्या शंकर च्या मनात काय चालले होते हे कुणाला लक्षात आले नाही? घरचे सदस्य बाहेर असल्याने शंकर ने विषारी द्रव्य प्राशन केले, दुपारी घरचे लोकं आले त्या वेळी तो बेशुद्ध अवस्थेत पडून दिसला नातेवाईकांनी शंकर ला गाडीत टाकून ग्रामीण रुग्णालय वणी येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले वणी पोलिसांनी मॄतकाचा पंचनामा करून दिनांक 04 लाच सायंकाळी मॄतकाचे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शंकरने असा टोकाचा निर्णय का घेतला असावा? मृत्युचे नेमके कारण अजुन तरी अस्पष्ट असले तरी, अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, शंकरच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments