ADvt

आनंदाने बाप्पाला निरोप देताना 32 वर्षीय युवकावर काळाचा घाला....
श्री गणेश मिरवणुकीत वाद्य वाजविणाऱ्या युवकाचा अचानक मृत्यू.....

वणी :- प्रमोद लोणारे

युवकांत सध्या ढोल ताशा वाजविण्याची एक क्रेज बनले आहे. मात्र कोणता वेळ कसा येईल हे उमजने कठीण असुन वणीतील एका युवकाचा ढोल ताशा वाजवीत असताना अचानक चंद्रपूर CHANDRAPUR येथे दुर्दैवी मृत्यू DEATH झाल्याची घटना दिनांक 28 ला रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

      वणी भीमनगर येथील रहिवासी सिद्धार्थ मरकवाडे, वय 32 वर्ष,  वणी नगर परिषद येथे घंटागाडी वर् कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता, व ता.२८ ला मित्रांसोबत चंद्रपूर येथे गणपती विसर्जन करिता ढोल ताशा वाजविण्यासाठी गेला होता. त्याला तेथेच हृदयविकारचा तीव्र झटका आल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले व डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मूल सासू सासरे असा मोठा परिवार आहे  ता.२९ शुक्रवार ला वणी येथे त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असुन संपूर्ण शहरात शोककळा पसरली असुन त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments