ADvt

अनाथांच्या नाथा तुज नमो......



असाही एक दलितमित्र....मेघराजजी भंडारी...

वणी :- सुरज चाटे

     वणीलगत चिखलगाव परिसरात असलेली श्री रामदेव बाबा मुख बधीर विद्यालय यात मुख बधीर, अपंग, मतिमंद विविध ठिकाणाहून असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या सुख दुःखात अळी अडचणीत मायेचा आधार देणारी एकमेव संस्था म्हणजे श्री रामदेव बाबा मुख बधीर विद्यालय. 
     कार्याची दखल न व्हावी ते कार्यच नव्हे....दखल घेतलीच पाहिजे किंवा आपल्याला श्रेय मिळावे अशी आशा न बाळगता... गोरगरीब व मुख बधिरांचा विकास या उद्देशाने विविध ठिकाणी निस्वार्थ सेवा देणारे व अपंग मुलींचे लग्न असो किंवा, शिक्षणाचा विषय जिथे घरचे आपले हातपाय थांबवते तिथे त्या लेकराला ही संस्था मायेचा आसरा देत त्यांना आई वडिलांन प्रमाणे जोपासना करण्याचे कार्य या संस्थे मार्फत केल्या जाते. रामदेव बाबा मुखबधीर विद्यालय, श्री रामदेवबाबा अपंग मुकबधीर कर्मशाळा, श्री रामदेवबाबा मतिमंद विद्यालय या संस्थेची स्थापना गोर गरीब जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने 1983 साली करण्यात आली. यात विविध उपक्रम राबवून समाजात जे विद्यार्थी आपल्या अपंगत्वा मूळे किंवा कुष्ठरोगा मुळे तसेच अन्य त्रासामुळे आपली जगण्याची इच्छा दाखवत नाही अशांना सहारा देण्याचे कार्य या संस्थे मार्फत करण्यात आले. या संस्थेला महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्काराने गौरविले आहे. दरम्यान त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाकडून दलितमित्र हा मान संस्थेचे आधारस्तंभ मेघराजजी भंडारी यांना देण्यात आला. त्यांचा ही संस्था उभारणीत महत्वपूर्ण सिंहाचा वाटा असुन, असा गोरगरिबांचा कैवारी संकटकाळी गोरगरीब,कुष्ठरोगी, अपंग, मुख बधीर यांच्या जीववणातील एक अविस्मरणीय नेतृत्व म्हणजे संस्थेचे आधारस्तंभ तथा श्री रामदेवबाबा सत्संग मंडळ वणीचे कार्यकारी अध्यक्ष दलितमित्र मेघराजजी भंडारी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
    

Post a Comment

0 Comments