ADvt

वाघा नंतर आता अस्वलीचा मुक्त संचार....











वणी नॉर्थ क्षेत्र, उपाययोजनेची गरज : नागरिक व वेकोली कामगारात दहशतीचे वातावरण...

वणी: - सुरज चाटे

     वणी नॉर्थ क्षेत्राच्या पिंपळगाव कोळसा खाणीत गेल्या काही महिन्यापुर्वी पट्टेदार वाघाने दर्शन दीले होते. आता खाणीच्या क्षेत्रात आस्वलीचे दर्शन झाल्याने कामगारात दहशतीचे वातावरण नीमार्ण झाले आहे. पिंपळगाव कोळसा खाण गेल्या पाच वर्षापासुन बंद होती. मात्र गेल्या काही महीण्यापासून ही खाण सुरु करण्यात आली आहे. आता वाघानंतर अस्वलीचे दर्शन झाल्याने नागरिक व वेकोली कामगारात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 



     गेल्या पाच वर्षा पासुन उत्पादन बंद असलेल्या कोळसा खाणीचे कामगार दुसऱ्या कोळसा खाणीत हलवुन ही खान बंद करण्यात आली. तेव्हा पासुन ही खाण उघड्यावर होती अशात या खाणीत पट्टेदार वाघाचे दर्शन अनेकाना झाले. गेल्या काही महीण्यापुर्वी कोळसा खाणीच्या सी. एच. पी. क्षेत्रात वाघाने बकरीचा फड़शा पाडताना अनेकानी पाहले  होते. परंतु गेल्या काही दिवसापासून पट्टेदार वाघांन दर्शन दीले नाही. अशात काही महीन्या पासुन इतर क्षेत्रात हलवण्यात आलेल्या कामगाराना पुन्हा पिंपळगाव खाणीत पाठवून उत्पादन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या असताना गेल्या १४ सप्टेंबर ला पिंपळगाव कोळसा खाणीच्या आर. सी. कार्यालया समोर रात्री ८ वा च्या दरम्यान अस्वलीने खाणीच्या क्षेत्रात अचानक दर्शन दीले. कामावर असलेल्या कामगारानी त्याला आपल्या कॅमे-यात बंद केले. दि.१५ ला सकाळी स्वाणीच्या क्षेत्रा लगत असलेल्या अहेरी फाट्याच्या रोडवर काही कामगार व गावकऱ्यानी अस्वलीला सकाळी मुक्त संचार करताना बघीतले. या क्षेत्रात नेहमी आढळून आलेल्या जंगली प्राण्याचा मुक्त संचाराने या क्षेत्रात असे प्राणी आले कुठून हा सुद्धा प्रश्नच आहे.

     गेल्या काही महीण्यापुर्वी ब्राम्हणी, कोलार पीपरी, अहेरी व पिंपळगाव खाणीत वाघाचे दर्शन होत होते. यात एका वाघाने माणवावर हल्ला चढवत जीवे मारले होते. त्यावेळी मोठा हंगामा झाला होता, त्यावेळी वनविभागाने पिंजरे लावुन वाघाला पकडण्यात आहे होते. तरी पण या क्षेत्रात अजुन ही वाघ आहे परन्तु त्यानी माणवी जीवावर हल्ला केला नाही. गेल्या काही महीण्या पासुन या क्षेत्रात वाघाचे दर्शन झाले नाही. अशा काळात आस्वलीने दर्शन दील्याने या क्षेत्राच्या कामगारा समोर नवीन समस्या दीसुन येत असुन, कोळसा खाणीच्या क्षेत्रात दीवस रात्रीच्या वेळी कामगार कोलार-पीपरी, जुणाळ, उखणी क्षेत्राच्या, कार्यक्षेत्रात जावे लागते, अशात कोणतीही अनुचीत घटना होऊ नये या दीशेने पाउल उचलण्याची सुद्धा गरज निर्माण झाली असुन वेकोली अधिकाऱ्यांनी वनविभागाला माहिती देऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

     वाणीच्या क्षेत्रात असे वाघ आस्वल आढळून येत असल्याने प्रबंधकाकडून मुक्त संचार करणाऱ्या अशा प्राण्याला वन वीभागाने पकडून इतरत्र हलवण्यात. यावे या करीता वेकोली प्रबंधकाने प्रयास करण्याची मागणी कामगारा कडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments