ADvt

भव्य रक्तदान शिबिर...रक्तदान हेच श्रेष्ठ दान....


वणी :- 
      गोकुळ नगर, वणी येथे श्री दुधगंगा गणेशोत्सव मंडळ वणी येथे रक्ताची अडचण लक्षात घेता आगाऊचा खर्च टाळत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्साहाने युवकांनी यात सहभाग नोंदवत, रक्तदात्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आवश्यक ते योगदान दिले. 


     गोकुळ नगर हा सामाजिक जाणिव जपण्यात नेहमीच अग्रेसर असतो,  नेहमीच नित्य नियमाचे समाजुपयोगी उपक्रम नेहमीच सुरू असते. रक्ताची गरज लक्षात घेता, तसेच रक्तदान हेच श्रेष्ठ दान ब्रीद ओठी ठेवत, श्री दुधगंगा गणेशोत्सव मंडळ वणी दिनांक 23 सप्टेंबर 2023 ला रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील गोकुळ नगर वणी येथे करण्यात आले यावेळी 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांनी मौलिक योगदान दिले असुन युवकांनी व मंडळांच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.  

Post a Comment

0 Comments