ADvt

केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या "केशवस्मृती" मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा थाटात.....





वणी : प्रतिनिधी

      वट वृक्षाचं बीज मोहरीहुन लहान असतं, त्याला मायेने पाणी घालावं लागतं, जबाबदावने जोपासावं लागतं तेव्हाच त्याचा वटवृक्ष होऊ शकतो. २७ मार्च १९९२ साली 'केशव नागरी' या पतसंस्थेचं बीज रोवलं गेलं आणि या कालावधीत वणी शहरासोबतच संपूर्ण यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र करून संस्थेच्या वणी, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा व यवतमाळ येथे शाखा कार्यरत आहे व उमरखेड शाखा प्रस्तावित असून लगतच्या जिल्ह्यात लवकरच नविन शाखा उघडण्याचा मानस आहे. प्रगतीकडे वाटचाल होत असतांना कार्यविस्तार अधिक सुनियोजित पद्धतीने व्हावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयीने सुसज्ज अशी केशवस्मृती या नावाने संस्थेची मुख्य कार्यालयाची वास्तू पूर्णत्वास आलेली आहे.

      वणी येथे मुख्यालय असलेले येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे स्वमालकीचे मुख्य कार्यालय "केशवस्मृती" या मुख्यालयाची वास्तु जुने श्रीकृष्ण भवन जवळील डॉ. तुगनायत यांच्या दवाखान्या समोर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. या मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवारी दिनांक २७ सप्टेंबर २०२३ ला दुपारी चार वाजता उत्साहात पार पडणार आहे.
     या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. सुनिलजी देशपांडे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख रा.स्व.संघ यांच्या शुभहस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर खोंड हे असणार आहे. 


      कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून श्री. विवेकजी जुगादे प्रदेश महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री हंसराज अहिर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री, माजी राज्यमंत्री तथा यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार- मदन येरावार , वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघ चालक बंडुपंत भागवत, नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सह.संस्था यवतमाळ , भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. 
     या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल आक्केवार, संचालक गजानन अघळते , सतिश कुल्दीवार, अनिल रईच , अरुण कावडकर , किसनलाल खुंगर, प्रदिप राशतवार , विलास लाखे, सुधिर डांगरे, सौ कविता इंगोले, सौ.कल्पना गुंडावार, तज्ञ संचालक गणपत अतकारे, विनय कोंडावार  व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments