ADvt

सोळा तासाच्या आंदोलनानंतर अखेर दिपक मत्ते यांच्या नेतृत्वात पिंपळगाव वासियांच्या आंदोलनाला मोठे यश....वेकोली कडुन रोडवर आलेली माती हटविण्याचे कार्य सुरू :- रस्त्याची उंची देखिल कमी करणार, आंदोलना दरम्यान खदानीतील पूर्ण कामे ठप्प...

वणी :- सुरज चाटे
     वणी नॉर्थ क्षेत्रात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असुन वेकोलीचे उत्पन्न पाहता सोइ सुविधेचा अभाव मात्र नेहमीच वेकोलीकडून दिसून येतो त्यामुळे जवळच असलेल्या खाणीतील विविध समस्येचा सामना पिंपळगाव परिसरातील गावकऱ्यांना करावा लागतो त्यामुळे विविध समस्येला कंटाळून पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी वेकोलीच्या विविध समस्यां विरोधात भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष तथा मा सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात दिनांक 28 ला सकाळी 6 पासुन रास्तारोको आंदोलन पुकारले होते दरम्यान संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. रात्री 10 वाजेपर्यंत कोळशाची वाहतूक रोखली होती अखेर सोळा तासाचया रस्ता रोको नंतर वेकोली प्रशासन नमल्याने आंदोलन कर्त्यांच्या मागण्या चे निराकरण होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मांडल्याने वेकोलीने लगेच रस्त्यावर आलेली डम्पिंग हटविण्याचे कार्य सुरू केले तसेच रस्त्याची उंची देखील बारा फुटाणे कमी करणार तसेच इतर मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन सुद्धा दिले. त्यानंतर रात्री 10 वाजताच्या नंतर दिपक मत्ते यांच्या नेतृत्वात सुरू असलेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. 
     There is a large number of coal mines in Vani North area of WCL and considering the income of WCL, the lack of convenience is always seen from Vekoli, so the villagers of Pimpalgaon area have to face various problems in the nearby mine. Under the leadership of Deepak Matte, the Rastraroko movement was called from 6 am on 28th, during which the entire traffic came to a standstill. Transport of coal was stopped till 10 pm. Finally, after sixteen hours of blocking the road, WCL administration gave in and stated that the protest will not be withdrawn until the demands of the protestors are not resolved. He also promised to fulfill other demands. After that, after 10 pm, the Road Roko movement led by Deepak Matte was called off.

     वेकोली उकणी क्षेत्रा अंतर्गत मौजा पिंपळगाव कडे जाणाऱ्या पोच मार्गावर रस्त्या लगत अंदाजे दहा फूट डम्पिंग आली असून डम्पिंग घसरून जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावाचा मार्ग नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. मागील काही काळात डम्पींग घसरुन अनेक रस्ते बंद झालेले आहे. असे डम्पिंग घसरण्याच्या दुर्घटना परिसरात या अगोदर सुद्धा घडल्या आहे. डम्पिंग गावा जवळ असल्यामुळे तेथील निघणाऱ्या धुळामुळे गावाकऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचत आहे. अनेक आजार विकार जसे (दमा, हृदयवीकार, त्वचारोग) व इतर श्वसनाचे अनेक आजार परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र या समस्याकडे वेकोली अंतर्गत उपाययोजना न करता समस्येकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. वारंवार असे निदर्शनास आले असुन, तसेच वेकोली निर्मित पिंपळगावाच्या पूर्वेस जे रस्त्याचे काम केल्या जात आहे तो रस्ता जमिनीपासून अंदाजे २५ ते ३० फूट उंच नियमबाहय रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे शेतामध्ये बैलगाडी, वाहन, व इतर वाहतुक करणे कठीन झाले आहे. वेकोली उकणी क्षेत्राच्या निष्काळजी नियोजनामुळे पिंपळगांव स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता व उकणी गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. गेल्या काही वर्षा पूर्वी वेकोली प्रशासनाने उकणी रस्ता हा सहा माहिन्यामध्ये नवीन पक्का रस्ता बनवून देऊ असे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजूनही वेकोली कडुन रस्ता तयार करण्यात आलेला नाही. वेकोली प्रशासनाच्या अशा निष्काळजी धोरणामुळे व अकृतिशील नियोजनामुळे गावात येणारे रस्ते क्षमतेपेक्षा जास्त उंच असल्यामुळे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या अति पाऊसाने जवळीक असलेल्या नदीच्या महापुरात पाण्याच्या प्रवाहास उंच रस्त्यांमुळे बाधा निर्माण होत असून पाण्याचा पसराव होत नाही. त्यामुळे गावातील १००% शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांवर मोठे संकट ओढवत असुन नुकसानीच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येस वेकोली प्रशासन प्रवृत्त करीत असल्याचा आरोप सुद्धा निवेदनातून भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष तथा मा सरपंच दीपक मत्ते यांनी केला आहे. तसेच यामुळे सभोवताल असणाऱ्या गावांना जलसमाधी घेण्यास भाग पडल्या जात आहे. 
     
     वेकोली उकणी क्षेत्राच्या असल्या आडमुठे धोरण व जीवघेण्या कार्यशैली विरोधात लोकशाही मार्गाने मंगळवार दि, २८/११/२०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता पासुन पिंपळगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष तथा मा सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात असंख्य गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सकाळ पासुन रस्ता रोखण्यात आला होता कोणतीही वाहतूक दुपारी 3 वाजे पर्यंत झाली नाही तसेच कोळशाची वाहतूक रात्री 10 वाजेपर्यंत कोळशाची वाहतूक रोखली होती अखेर सोळा तासाच्या रस्ता रोको नंतर वेकोली प्रशासन नमल्याने आंदोलन कर्त्यांच्या मागण्या चे निराकरण होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मांडल्याने वेकोलीने लगेच रस्त्यावर आलेली डम्पिंग हटविण्याचे कार्य सुरू केले तसेच रस्त्याची उंची देखील बारा फुटाणे कमी करणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले. त्यानंतर रात्री 10 वाजताच्या नंतर दिपक मत्ते यांच्या नेतृत्वात सुरू असलेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मा जि प सदस्य विजय पिदुरकर, वेकोली चे वणी नॉर्थ मुख्य महाप्रबंधक, वेकोली अधिकारी, तहसिलदार धुरधर सर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वणीचे प्रमुख यांनी भेट दिली. या आंदोलनाने कोळसा वाहतूक चांगलीच ठप्प झाली होती दरम्याम ट्रकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. 

Post a Comment

0 Comments