ADvt

बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.....



वणी :- राजु गव्हाणे

     शहिद विर बिरसा मुंडा जयंती विविध गावात व शहरात मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते दरम्यान वणी तालुक्यातील गणेशपूर येथे शहीद बिरसा मुंडा जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत मोठ्या थाटात व उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली. 

     गणेशपूर येथे शहिद वीर बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात नाचत गात व समाजबांधवांना प्रबोधन करीत साजरी करण्यात आली. येथील समाज बांधवांनी वीर बिरसांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेसमोर कार्यक्रमाचे आयोजन केले. बिरसा मुंडा चा प्रतिमेला सरपंचा जूनगरी ताई यांनी माल्यार्पण केले तुकडोजी महाराज यांना सुद्धा माजी सरपंच तेजू बोड़े यांनी व छत्रपति शिवाजी महाराज याना कल्पना मेश्राम यांनी माल्यार्पण केले, रानी धुर्गवती मड़ावी यांना सोनू मेश्राम यांनी मलार्पण केले, वीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला सूप्रिया राजगडकर यांनी मलार्पण केली आदिवासींचे दैवत भिवसन ची पूजा सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित केली व गावात मिरवणूक काढण्यात आली. 
      या कार्यक्रमाला प्रबोधन करण्याकरिता आदिवासी साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, यावेळेस वीर बिरसांचा इतिहास, आदिवासी संस्कृतीचा वारसा, आदिवासींच्या धर्म व बिरसांचा संघर्ष आणि त्यापासून घेण्याची प्रेरणा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांनी भाग घेतला होता. यावेळी जय बिरसामुंडा, जय सेवा अशा जल्लोषात घोषणा बाजी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गेडाम यांनी केले तर आभार संदीप मेश्राम यांनी मानले. यावेळी बिरसा मुंडा उत्सव समितीच्या अध्यक्षा कल्पना मेश्राम, उपाध्यक्ष सोनू मेश्राम यांनी मौलिक मार्गदर्शन केले. तसेच सचिव सुप्रिया राजगडकर, शारदा मेश्राम, मनीषा तिरणकर, तानेबाई, आशाबाई, प्रमिला, नंदाबाई, मायाबाई, शोबाबाई मेश्राम आदी उपस्थित होत्या. 
     या कर्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजू मेश्राम, बबन तिरणकर, दादाजी मेश्राम, दादाराव मेश्राम, प्रकाश तिरणकर, अजब मेश्राम, लक्ष्मण कुळमेथे, सुनिल तिरणकर, निकेश मेश्राम, अरविंद मेश्राम, अमोल मेश्राम, संदिप सप सिडाम, रक्षक गेडाम, रुपेश मेश्राम, गोलू राजगडकर, प्रवीण मेश्राम, विष्णू सिडाम, नितेश मेश्राम आदी बांधवांनी अथक परिश्रम घेतले.  

Post a Comment

0 Comments