ADvt

हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक...कुख्यात ‘शेंगदाण्या’ विरुद्ध वणी पोलिसांची कार्यवाही.... 

वणी : - सुरज चाटे

     दिवसेंदिवस वणीत गुन्हेगारीत क्षेत्रात वाढ होत असुन हातात धारदार चाकू घेऊन लोकांना धमकावून दहशत निर्माण करीत असताना कुख्यात शेंगदाण्या  उर्फ संजय वाघडकर याला वणी पोलिसांनी अटक केली. 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता दरम्यान गोकुळ नगर परिसरात विनर्स बार समोर ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्द शस्त्र अधिनियम व दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात बंदोबस्त सुरु असताना पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हेगार संजय वाघडकर उर्फ शेंगदाण्या रा. गोकुळनगर वणी  हा विनर्स बार समोर हातात धारदार शस्त्र घेऊन येणारे जाणारे लोकांना धमकावून धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार पो.नि. अजित जाधव यांना मिळाली. ठाणेदार जाधव यांना आरोपी हा अट्टल गुन्हेगार तसेच सहजासहजी ताब्यात येणार नसल्याची खात्री असल्याने डीबी पथकाचे विकास धड्से यांना पोलीस पथकासह रवाना केले.

पोलीस पथकाने धुमाकूळ घालत असलेल्या शेंगदाण्याला शस्त्र खाली ठेवून सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र त्याने विरोध दर्शवून व हातात असलेले चाकू पोलिसांच्या दिशेने भिरकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी 37 से. मी. लांब स्टीलचा धारदार चाकू जप्त केला. आरोपी शेंगदाण्या विरुद्द शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह कलम 506 तसेच दारूबंदी कायदा कलम 85(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात व ठाणेदार पो.नि. अजित जाधव यांचे निर्देशानुसार गुन्हे शोध पथकाचे जमादार विकास धड्से व श्रीनिवास गोनलावार आदींनी केली.

Post a Comment

0 Comments