वाहनात स्वार कुटुंबाचा दुर्दैवी अंत...
पाच वर्षीय इनायानेही घेतला अखेरचा श्वास :- एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
महिन्याच्या सुरवातीचा दिवसही घातकच.....
वणी :- सुरज चाटे
शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबरचा कला दिवस वणीकर कधीही विसरणार नाही. शहराच्या बाहेरील भागात वणी - घुग्गुस मार्गावर झालेल्या भीषण अपघातात रियाजुद्दीन शेख (५५) वसंत गंगा विहार, त्यांच्या तीन मुली आणि पाच वर्षांच्या पुतणीचा गंभीर अपघात होऊन अपघातात तीन मुली जागीच ठार झाल्या तर अपघाताचे दृश्य पाहून वडिलांना वृदयविकराचा झटका आला व त्याने सुद्धा जगाचा निरोप घेतला. दि. 31 ला रात्री उशीरा चौघांवर अंत्यविधी प्रकिया पार पडली. इनाया हिच्यावर नागपुर येथे उपचार सुरू होते मात्र दि. 01 ला पहाटे तिने सुद्धा जगाचा निरोप घेतला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
In a horrific accident on the outskirts of the city on the Wani-Ghuggus road, Riyazuddin Sheikh (55) of Vasant Ganga Vihar, his three daughters and a five-year-old niece met with a serious accident. The three daughters died on the spot, while the father, seeing the scene of the accident, suffered a cardiac arrest and also passed away. The last rites of the four were performed late at night on the 31st. Inaya was undergoing treatment in Nagpur, but she also passed away on the morning of the 1st. This incident has spread grief in the area.
मिळालेल्या माहितीनुसार, रियाजुद्दीन शेख (५५) हे लाल पुलिया भागात गॅरेज चालवत होते. शुक्रवारी सुट्टी असल्याने ते घरीच होते. सकाळी त्यांची मोठी मुलगी मायराने (१८) कार चालवायला शिकवण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण अखेर मुलीच्या हट्टापायी त्यांनी परवानगी दिली. दोन्ही लहान बहिणी जोया (१२) आणि अमिबा (११) आणि पुतणी इनाया (५) हिनेही सोबत जाण्याचा हट्ट धरला आणि हाच क्षण रियाज, जोया, अमीबा, मायरा, ईनाया यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
सकाळी सुमारे १०.४५ वाजता एम एच 01 ए एच 5700 या स्कोडा कारने ब्राम्हणी रोड कडे जात असताना वणी - घुग्गुस मार्गावर दावत ए इस्लाम शाळे जवळ कारचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडर वरून उडत समोरून येणाऱ्या एम एच 40 ए के 0358 या ट्रकला धडकली. अपघात इतका भीषण होता की कारचा ड्रायव्हर साईडचा भाग पूर्णतः चकनाचूर झाला.
अपघातात मायरा, जोया, अमिबा यांचा जागीच मृत्यू झाला तर रियाज शेख हे किरकोळ जखमी होते, परंतु आपल्या डोळ्यासमोर घडलेले हे भीषण दृश्य ते सहन करू शकले नाहीत. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला. दि. 31 ला रात्री उशिरा त्या चौघांवर अंत्यविधी प्रकिया पार पडली. इनाया हिला उपचारासाठी नागपुर ला रेफर करण्यात आले होते, तीचा आय सी यू मध्ये उपचार सुरू असताना तिने सुद्धा दि. 01 ला पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. तर नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस सुद्धा घातवारच ठरल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण वणी शहरात शोककळा पसरली आहे.










0 Comments