वणी पालिकेच्या कर मुल्यांकनास स्थगिती...
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वणीकर जनतेला दिलासा..
वणी :- सुरज चाटे
वणी नगर परिषदने सन २०२५-२६ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षाकरीता नविन प्रस्तावित चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन बाबत वणीकर जनतेला काही दिवसापुर्वी नोटीस पाठविल्या होत्या त्यामध्ये चालू आर्थिक वर्षाचे करापेक्षा काही ठिकाणी ३ ते ४ पट आणि काही ठिकाणी ६ पट वाढीव कर प्रस्तावित केला होता की जो पुर्ण पणे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीचे विरोधात होता तसेच लोकांचे आर्थिक नुकसान करणारे होते, त्यामुळे वणीतील जनतेच्या वतीने माजी आमदार संजीवरेडडी बोदकुरवार व इतर भाजपा पदाधिकारी यांनी दि. १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना त्याबाबत लेखी निवेदन देवून सदर प्रस्तावित कर आकारणीस सस्थगिती देणेबाबत विनंती केली होती. तसेच इतरही राजकीय पक्षांनी, पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी तसे निवेदन दिले होते.
त्या निवेदनाची व माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेला पाठ पुरावा याची दखल घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रस्तावित कर आकारणी स्थगित करणे संदर्भात आदेश पारीत केला व त्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने नगर परिषद वणीला कळविले आहे.
यामुळे वणीकराना मोठा दिलासा मिळाला असुन जो - तो, नागरिक, व्यापारी वर्ग समाधानी असुन मोठे टेंशन त्यांच्या दोक्याहून हलके झाले आहे. वणीकर जनतेला दिलासा दिल्यामुळे त्यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणीकर जनते तर्फे आभार व्यक्त केले.








0 Comments