ADvt

राजुर - चिखलगाव - गणेशपुर जि. प. गणासाठी फैजल च्या नावाची चर्चा.....



राजुर - चिखलगाव - गणेशपुर जि. प. गणासाठी फैजल च्या नावाची चर्चा.....

वडिलांच्या जनसंपर्काचा फायदा मुलाला मिळणार..

संभाव्य उमेदवारांच्या यादीत नांव चर्चेत....

वणी : सुरज चाटे

    नगरपरिषद सह जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले असून, यवतमाळ जिल्हा परिषदे करीता राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. चाचा विधायक है हमारे...या बॅनर ने सर्वाधिक चर्चेत असलेले तसेच अतिशय दयाळू व गोरगरीब तथा जनसेवेचा  राजूर येथील समाजसेवी चेहरा म्हणुन परिचित असलेले स्व. बशीर खान यांचा मुलगा फैजल बशीर खान चिखलगाव - राजूर - गणेशपुर गणा च्या जिल्हा परिषद उमेदवारी करीता सध्या एका मजबूत व जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या युवा व्यक्तिमत्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. जर पक्षाने संधी दिल्यास फैजल भगवा फडकविणार काय? ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   
     Uncle is our legislator... This banner is the most talked about and also very kind and poor and known as the social worker of Rajur. Late Bashir Khan's son Faizal Bashir Khan is currently in the discussion for the Zilla Parishad candidacy of Chikhalgaon - Rajur - Ganeshpur Gana. There is a strong discussion about a young personality who has made a place in the hearts of the people. If the party gives a chance, will Faizal hoist the saffron flag? It will be important to see.
      चिखलगाव - राजूर - गणेशपुर मध्ये फैजल बशीर खान यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत अग्रस्थानी असून, त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फैजल बशीर खान हे आमदार संजय देरकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणुन परिचित असुन शिवसेना (उबाठा) चे खंदे व एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. वडील बशीर खान यांच्याकडून मिळालेला राजकीय वारसा त्यांच्या कडे जो व्यक्ती जात होता त्याचे समाधान ते करीत असायचे. वाडीला प्रमाणे मुलगा ही जाती पातीचे राजकारण न मानता मुस्लिम असुन सुध्दा हिंदूंच्या विविध धार्मिक स्थळी जाऊन गोर गरीबांची मदत करीत सामाजिक बांधिलकी फैजल ने जपली आहे. सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या वडिलांची ख्याती होती. 
  सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, तसेच विविध सामाजिक उपक्रमातून जनतेच्या सहवासात राहून गणात फैजल लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व सामाजिक कार्यामुळे त्यांना चांगला जनाधार लाभला आहे.  
     यावेळी चिखलगाव - राजूर - गणेशपुर गणा मध्ये निवडणुकीची चुरस अधिक रंगणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत. स्थानिक नागरिकांना एक सक्षम, प्रामाणिक आणि जनतेचे हित जोपासणारा सेवक हवा असल्याने फैजल बशीर खान यांच्या नावाभोवती उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  
    आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत फैजल बशीर खान हे बळकट, लोकप्रिय आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून उदयास येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments