ADvt

वणीतील प्रभागांत मध्यरात्रीचा गोटमार...



वणीतील प्रभागांत मध्यरात्रीचा गोटमार...

वणीतील प्रभाग १३ व १४ मध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रात्री १२ च्या सुमारास घरांवर गोटे; अज्ञात व्यक्तींचा संशय, पोलिसांची धावपळ..

वणी :- सुरज चाटे

     वणी शहरातील प्रभाग क्रमांक १३ व १४ मध्ये म्हणजेच. रंगनाथ नगर, शास्त्री नगर, कोंढाणा वाडी परिसरात मध्यरात्री अचानक घरांवर गोटे मारण्याचा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास अचानक काही घरांवर गोटे येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
      गोटे नेमके कोणी मारले? त्यामागचा उद्देश काय? हे कृत्य कोण करत आहे? असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असून या प्रकारामुळे महिलांमध्ये, मुलांमध्ये व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली; मात्र गोटे मारणाऱ्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
      महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सातत्याने घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, रात्रीच्या शांततेत अचानक होणाऱ्या या गोटमारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित परिसरात गस्त वाढवावी व या प्रकाराचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एखादी अनुचित घटना घडल्यास?...
सदर गोटा जर कुणाला लागल्यास त्याचा गंभीर परिणाम समोर येऊ शकतो. दरम्यान या प्रभागात बरेच घरे कवेलु व टीनाचे आहे त्यामुळे आवाज जास्त येतो तर कधी आत सुध्दा गोटा जाण्याची भीती असते त्यामुळे या प्रकाराची वेळीच दखल घेणे महत्त्वाचे असून संबंधित आरोपीवर कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments