ADvt

टागोर चौक परिसरात पाण्याची ‘चन चन’...



टागोर चौक परिसरात पाण्याची ‘चन चन’...

दोन दिवसांपासून नळ बंद; भोंगा फिरवून माहिती द्यावी – विक्रांत चाचडा

वणी : शहरातील टागोर चौक परिसरात मागील दोन दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप युवा सेना लोकसभा अध्यक्ष विक्रांत चाचडा यांनी केला आहे.


     नळ येणार नसल्यास प्रशासनाने परिसरात भोंगा फिरवून नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नागरिकांना रोज नियमित पाणीपुरवठा करून पाण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments