ADvt

सुकनेगाव शिवारात वाघाची दहशत...विविध पथकासह रेस्क्यु टीम सुकनेगावातत्या दोन वाघाच्या छाव्यांचा मृत्यू भूकबळीमुळेच :- आणखी एका बछड्यासह वाघिणीची भटकंती...

परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वणी :- सुरज चाटे

      वाघ दिसल्याच्या चर्चा वणी सह तालुक्यात व लागून असलेल्या जंगल परिसरात नित्याचाच असतात, वाघ दिसून वाघाने हमला केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे. मात्र आता चक्क तालुक्‍यातील सुकनेगाव शिवारात असलेल्‍या तलावाजवळ दि. 31 जानेवारी व दिनांक 01 फेब्रुवारी ला वाघाचे दोन छावे वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्‍थेत आढळल्‍याने परीसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान तालुक्यात आणखी वाघ असल्याची चर्चा रंगत असल्याने आता वाघीण सुकनेगाव परिसरात तर नाही ना? मग या छाव्यांचा मृत्यू कसा झाला असावा?, काही वेगळे कारण तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्या छाव्यांचा मृत्यू भूकबळीने झाला असावा असा कयास वर्तविला होता दरम्यान उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन त्यात या छाव्यांचा मृत्यू हा त्यांच्या पोटात काही नसल्याने भूकबळीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन वन विभागाच्या विविध पथकासह सर्च ऑपरेशन सुरू आहे.

     Talks of tiger sightings are common in Vani taluk and adjoining forest areas, there have also been incidents of tiger sightings and attacks by tigers. But now near the lake in Suknegaon Shivarat in the taluk. On 31st January and 01st February two tiger cubs were found dead in different places and there was a stir in the area. Meanwhile, since there is talk of more tigers in the taluka, are there not tigers in the Suknegaon area? Then how should these camps have died?, there is no other reason? There were many such questions. While it was speculated that the deaths of those camps may have been due to starvation, the northern inspection report was received and it is clear that the deaths of these camps were due to starvation as there was nothing in their stomachs. Residents of the area have been alerted and a search operation is underway with various teams of the forest department.

मृतावस्थेत मिळालेला वाघाचा बछडा

    वणी तालुक्‍यात कोळसा परिसर तसेच जंगल परीसरात वाघाचा मुक्त संचार असल्‍याचे यापुर्वी स्‍पष्‍ट झाले होते दरम्यान वाघाला पकडण्यात यश सुद्धा आले होते. मात्र परिसरात वाघ किती आहे हे अजूनतरी स्पष्ट नसले तरी, शेतकरी वाघाच्‍या दहशतीत वावरत असल्‍याचे नाकारता येत नाही. यापुर्वी वाघाने जनावर तसेच शेतमजुरावर हल्‍ला चढविल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहे.
    सुकनेगाव येथील तलावाजवळ आई पासुन विभक्‍त झोलेले अंदाजे अडीच ते तीन महीन्‍याचे वाघाचे 2 छावे मृतावस्‍थेत आढळुन आले होते. सुकनेगाव परिसरात गट नंबर 257 मध्येच पाणी साठा उपलब्ध आहे इतर कुठेही नाही. कदाचित एखाद्या नरापासून बचावासाठी आपल्या पिलांच्या रक्षणासाठी वाघिणीने त्यांना विभक्त केले असावे असा सुद्धा कयास वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्या छाव्यांचा भुकबळीमुळे मृत्‍यु झाल्‍याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. घटनास्‍थळाचा पंचनामा केल्‍यानंतर मंदर येथील निलगीरी वनात मृत वाघाच्‍या पिलावर अत्‍यंसंस्‍कार करण्‍यात आले होते. याघटनेने सुकनेगाव परीसरात चांगलीच खळबळ माजली असुन, भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वन‍परीक्षेत्रीय अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी तातडीने पथकासह घटनास्‍थळ गाठले. त्या दोन्ही छाव्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला होता. परंतु त्या छाव्यांचा मृत्यू भूकबळी मुळेच झाल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी स्पष्ट केले आहे. 
     
     
1 वाघिणीसह आणखी एका छाव्याचा मुक्त संचार...पायांचे ठसे प्राप्त...
     वाघाच्या 2 छाव्यांचा भूकबळीमुळे मृत्यू झाला असुन वाघीण मात्र परिसरात घिरट्या घालत असुन याच परिसरात वाघ सुद्धा असल्याचा कयास वर्तविल्या जात आहे. परिसरात वाघ व वाघिणीचा छाव्यां सह मुक्त संचार होत आहे. दरम्यान त्यांच्या पायांचे ठसे सुद्धा मिळाले असल्याने नागरिकांत व शेतकरी वर्गात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 
     
तिन्ही तालुक्यातील वन विभागाचे पथकासह रेस्क्यू टीम सुकनेगावात...
      अडीच ते तीन महिन्यांच्या दोन वाघाच्या छाव्यांचा भूकबळीमुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. दरम्यान या परिसरात वाघ असल्याची चर्चा असुन वणी, झरी,मारेगाव, पांढरकवडा येथील वन विभागाच्या पथक यात किरण जगताप भावसे उपवनसंरक्षक, पांढरकवडा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर हटकर सहा.वनसंरक्षक, प्रभाकर सोनडवले वनपरिक्षेत्र अधिकारी वनी, टि.एन.सांळुंके , वंदना धांडे, पवार साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा यांच्या संयुक्त विद्यमाने वनी, मारेगाव, मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी अधिकारी तसेच मा.श्याम जोशी मानद वन्यजीव संरक्षक यवतमाळ यांची टीम, रेस्क्यु टीम पांढरकवडा इत्यादी वनकर्मचारी सुकनेगावात दाखल झाले असुन 10 दल व 40 लेबर सह पुढील शोध मोहीम सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments