ADvt

सुकनेगाव गोडेगाव शिवारात वाघाचे दर्शन....



वणी :- सुरज चाटे

     वणीसह परिसरात जंगल परिसर मोठ्या प्रमाणात आहे. या विविध जंगल परिसरात वाघ दिसल्याच्या चर्चा वणी सह तालुक्यात व लागून असलेल्या जंगल परिसरात नित्याचाच असतात. सुकनेगाव शिवारात असलेल्‍या तलावाजवळ दि. 31 जानेवारी व दिनांक 01 फेब्रुवारी ला वाघाचे दोन छावे वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्‍थेत आढळल्‍याने परीसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान त्यांचा मृत्यू भूकबळीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ला पहाटे 3 वाजून 34 मिनिटांनी कंपार्टमेंट झोन क्रमांक 6 मध्ये सुकनेगाव - गोडेगाव परिसरात लागुन असलेल्या वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

     There is a large amount of forest area in the area including the forest. Near the lake in Suknegaon Shivarat. On 31st January and 01st February two tiger cubs were found dead in different places and there was a stir in the area. Meanwhile, it was clear that his death was due to starvation. Now on February 3, 2024, at 3:34 am, a tigress has been spotted in the trap camera of the forest department located in Suknegaon-Godegaon area in compartment zone no.6.

      वणीच्या आस पास असलेल्या जंगल परिसरात वाघिणीचा मनसोक्त फिरण्याचा अंदाज काही निराळाच असून ही वाघीण आता सुकनेगाव - गोडेगाव राखीव वन विभागाच्या कंपार्टमेंट झोन क्रमांक 6 मध्ये फिरत आहे. गावाच्या नजीक वाघीण पोहोचल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे त्यामुळे वणी वन विभागा कडून यांवर तातडीने पावलं उचलली जात आहे. या वाघिणीने प्राण्यांची शिकार केल्याचा अंदाज वर्तविल्या जात असून वाघिणीची विष्ठा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. सदर विष्ठा फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठविण्यात आली आहे. तसेच पहाटेच्या दरम्यान सुकनेगाव-गोडेगाव रस्त्यावर वाघिणीसोबत तिच्या छाव्याचे सुद्धा ठसे निदर्शनास आले आहे. एकूण 80 वन अधिकारी, कर्मचाऱ्यां सह मजुरांची टीम सर्च ऑपरेशन करीत आहे. 10 दला मध्ये काम सुरू आहे. तर विविध ठिकाणी 25 कॅमेरे लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 


    आता आपल्या दोन छाव्यांचा मृत्यू झाल्याचे त्या वाघिणीला माहीत आहे किंवा नाही? हा प्रश्न असुन एक आई आपल्या मुलांना शोधण्यासाठी जंगल परिसर पिंजून काढीत आहे. सुकनेगाव परिसरात गट नंबर 257 मध्येच पाणी साठा उपलब्ध आहे इतर कुठेही नाही. याठिकाणी वाघीण पाणी पिण्यास येऊ शकते असा कयास वर्तविल्या जात आहे. त्यामुळे परिसरात एकच भीतीदायक वातावरण पसरले असुन केव्हा कधी काय होणार याचा नेम नसल्याने वन विभाग सुद्धा सुकनेगाव राखीव जंगल परिसरात सर्च ऑपरेशन करीत असुन नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे. 

वन विभाग ऍक्टिव्ह मोडवर...विभागीय वन अधिकारी सुकनेगावात...
     वाघीण जरी शांत असली तरी परिसरातील परिस्थिती लक्षात घेता तात्काळ त्याच परिसरात वन विभागाचे वन रक्षक ठेवण्यात आले असुन, विविध पथक गठीत करण्यात येऊन चमू तयार करण्यात आली आहे, सदर चमू सुकनेगाव जंगल परिसर येथे दाखल झाली आहे. दिनांक 3 ला अनंता दिगोडे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) यवतमाळ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असुन, दुसऱ्या दिवशीही उपवनसंरक्षक किरण जगताप (भावसे) यांनी सुद्धा परिसराची पाहणी करीत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

त्या वाघिणीचा तातडीने योग्य तो बंदोबस्त व्हावा....
      परिसरात असलेल्या वाघाच्या दहशतीमुळे येथील जनता चांगलीच भयभीत झाली असुन त्यामुळे केव्हा कधी कोणती अनुचित घटना घडणार याचा नेम उरला नाही, त्यामुळे वन विभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा असे गावकाऱ्यांकडून बोलल्या जात आहे.

नागरिकांनो कामे करताना सतर्क रहा..एकमेकांशी संवाद साधा .....  प्रभाकर सोनडवले, वन परिक्षेत्र अधिकारी, वणी...
     वणी तालुक्यातील सुकनेगाव परिसरात वाघीण वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांनी आपली सावधगिरी बाळगावी, जंगल ठिकाणी एकटे जाऊ नये, रात्र होण्या आधी कामे उरकवून घरी यावे, सकाळी उजळ पडल्यावर शेतीवर जावे, रात्रपाळी करिता एकटे न जाता सोबत गळी न्यावे, सोबत काठी ठेवावी, व चर्चा करीत शेतकाम करावे तथा तशी काही माहिती असल्यास वनविभागास कळवावे असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी, वणी प्रभाकर सोनडवले यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना सांगितले. 

Post a Comment

0 Comments