पाटाळा पुलावरून युवकाने नदीत घेतली उडी...
प्रणय ने उडी का घेतली असावी?..
वणी :- सुरज चाटे
दिवसागणिक वाढते आत्महत्येचे प्रमाण दिसत असुन यात युवा पिढीचे प्रमाण जास्त होत आहे. दि. २७ ला एका युवकाने पाटाळा पुलावरून नदीत उडी घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना सीसीटिव्ही मध्ये टिपल्या गेली आहे.
The number of suicides is increasing day by day, and the number of young people is increasing. On the 27th, a shocking incident has come to light in which a young man jumped into the river from the Patala bridge. The incident has been captured on CCTV.
वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरुन एक तरुणाने नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सदर घटना महामार्गावरील सिसिटीव्ही मध्ये कैद झाली असून नदीत उडी मरणारा युवक जैन ले आऊट येथील प्रणय संजय गोखरे (23) असल्याचे बोलले जाते. युवकाची बाईक पुलावर आढळली आहे. प्रणय ने उडी का घेतली असावी?.. हे अजूनतरी अस्पष्ट असुन घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. तरुणाचा नदी पात्रात शोध सुरू असून त्याचा अद्याप थांग पत्ता लागला नाही. वर्धा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुणाचा नदी पात्रात शोध घेणे कठीण झाले आहे. शोधकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
0 Comments