पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्र राकेश भाऊ खुराणा यांच्या कडे....
७००कोटी रु च्या ठेवी ४३०कोटी RBI च्या निकशा नुसार सुरक्षित कर्ज वाटप
वणी :- सुरज चाटे
पुसद अर्बन कॉ ऑप. बँकेच्या पुसद येथील प्रशासकीय इमारतीत दि. ३० सप्टेंबर ला संचालक मंडळाची सभा होऊन त्यात उपाध्यक्ष राकेश भाऊ खुराणा यांना अध्यक्ष पदाचा प्रभार देण्यात आला. यापुढे संस्थेच्या पोट नियमातील तरतुदी नुसार अध्यक्ष शरद मैंद यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष राकेश खुराणा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतील.
Pusad Urban Co Op. Bank held a meeting of the Board of Directors on September 30 at the administrative building in Pusad and Vice President Rakesh Bhau Khurana was given the charge of the post of President. Henceforth, as per the provisions of the by-laws of the organization, Vice President Rakesh Khurana will assume the responsibility of the post of President in the absence of President Sharad Maind.
बँकेत सुमारे ७००कोटी रु च्या ठेवी असून त्यापैकी ४३०कोटी रु.रिझर्व बँकेच्या निकष नुसार सुरक्षित कर्ज वाटप केले आहे. वाटप झालेल्या कर्जाच्या सुमारे दुप्पट किमतीच्या मालमत्ता तारण घेण्यात आल्या आहेत. बँकेच्या ५ लाख रु पर्यंतच्या ठेवींना रिझर्व बँके ऑफ इंडियाशी संलग्न विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ( डीआयसीजीसी )अंतर्गत विम्याचे कवच असून त्या पूर्ण पणे सुरक्षित आहेत.त्यामुळे ठेवीदार व खातेदारांनी कोणत्याही अफ़वांवर विश्वास ठेऊ नये व घाबरून जाऊ नये.
यापुढेही बँकेचा कारभार पारदर्शक व जोमाने चालवून संस्थेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना चांगल्यात चांगली बँकिंग सेवा देण्यात येईल असे राकेश खुराणा व संचालक मंडळाने सांगितल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
0 Comments